बारशिंगवे ग्रामपंचायत माहिती
बारशिंगवे गावाची लोकसंख्या २७५५ असून, येथे तीन प्रभाग आहेत.
कुटुंब 610+
2755+
लोकसंख्या २७५५
ग्रामपंचायतीची लोकसंख्या :- 2755 (२०११ जनगणनेनुसार)
स्त्री 1384 - पुरुष :1371 अनु-जमाती :2131 अनु- 77 -
एकूण प्रभाग संख्या : ३
गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र 13. 980 हेक्टर
गावातील कुटुंब संख्या 610 (२०११ च्या जनगणनेनुसार)
वृक्ष लागवड :
a. रस्ता दुतर्फा वृक्षलागवड करून संगोपन केले.
b. मोकळे जागेत वृक्षलागवड करून संगोपन केले.
c. शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड करून संगोपन केले.प्राथमिक शाळा : वर्ग इयत्ता ७ वी पर्यंत माध्यमिक शाळा :- माध्यमिक विद्यालय बारशिंगवे इयत्ता ८ वी ते १० वी. अंगणवाडी केंद्रे :- एकूण ०४ रस्त्यावरील दिवाबत्ती :- एकूण पोल संख्या ८०


शिक्षण संस्था
जिल्हा परिषद शाळा बारशिंगवे
गावात जिल्हा परिषद शाळा असून तेथे इयत्ता १ली ते ७ वी पर्यंत वर्ग आहेत . आजमितीस शाळा इमारत आर.सी.सी. बांधकामात आहे.शाळा रंगरंगोटी केलेली आहे.
आजचे बालक हे उद्याचे भविष्य आहेत. लहान वयातच मुलांच्या आकलनशक्ती वाढविण्यासाठी योग्य पद्धतीचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. खाजगी शाळांमध्ये चढाओढ सुरू झाली असून जिल्हा परिषद शाळांपुढे ते एक आवाहन तयार झाले आहे.
बारशिंगवे येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील जिल्हा परिषद शाळा आधुनिक करण्याचा संकल्प केला असून खाजगी शाळेकडे वाढलेला कल लक्षात घेता जिल्हा परिषद शाळा ही ओसाड होत चालली आहे त्यासाठी जिल्हा परिषद शाळा देखील आधुनिक होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा वारंवार व्यक्त होत असताना याची गरज ओळखून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे
अंगणवाडी केंद्रे
बारशिंगवे अंगणवाडी
ग्रामपंचायत बारशिंगवे येथे दोन अंगणवाडी व भोईरवाडी राहुलनगर येथे एक एक केंद्र कार्यरत असून तीन अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत आहे एक इमारत दुरुस्ती करणे आवश्यक आहे सर्व ठिकाणी पाणी सुविधा उपलब्ध आहे तसेच तीन अंगणवाडी डिजिटल करण्यात आलेले आहेत. अंगणवाडीच्या मुलांना ग्रामपंचायतीमार्फत बेंच दिलेले आहेत. अंगणवाडी केंद्र पायाभूत सुविधांनी परिपूर्ण आहेत
ग्रामपंचायत बारशिंगवे *
-: यशोगाथा :-
बारशिंगवे गावाला सामाजिक,आध्यात्मिक,राजकीय,शैक्षणिक व क्रांतीकारी गांव म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखल जाते. प्रगतीच्या अनेक पाऊल खूणा सोडत गगनाला गवसणी घालणारी प्रगती ह्या गावाने केली आहे. तरीही ऐतिहासिक वारसा ह्या गावाने जपला आहे.बारशिंगव हे गाव घोटी सिन्नर रोड पासून १० किमी गावामध्ये भात उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत असते. त्या भाताची विक्री तालुक्याचे ठिकाण घोटी शाहर येथे होते.त्या ठिकाणी तांदळाची निर्मिती करणाऱ्या राईस मिल मोठ्या प्रमाणात उभारलेल्या असून त्यांच्या द्वारे तांदळाचे उत्पादन करण्यात येते आहे. सदर तांदूळ हा महाराष्ट्रातल्या कानठ्या प्रमाणात व्यापार होत आहे. घोटी गाव हे मोठी बाजार पेठ असून शनिवार आठवडे बाजारा निमित्त लगतचेबारशिंगवे गावालगत धार्मिक स्थळे कावनई कपिलधारा तिर्थ , सर्वतीर्थक्षेत्र टाकेद , विपश्यना केंद्र इगतपुरी, गजानन महाराज तपोभूमी कावनई इत्यादी तीर्थक्षेत्र असून बारशिंगवे गाव हे इगतपुरी जंक्शन रेल्वे स्टेशन पासून २० किमी अंतरावर आहे
*ग्रामपंचायत कार्यालय :- सर्व सुविधांनी परिपूर्ण असे अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय कार्यान्वित असून संपूर्ण कामकाज संगणकीय पद्धतीचे केले जाते* शैक्षणिक संस्था बाबत माहिती :- गावात प्राथमिक जि.प. शाळा - २ , माध्यमिक विद्यालय १,व अंगणवाडी ४ , असलेल्या शाळेत अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी आहेत * गावात मारुती मंदिर, सभामंडप रस्ते सिमेंट कॉँक्रिटकरण, झाल्याने गावच्या वैभवात भर पडली आहे. *भूमिगत गटार:- शासनाच्या भूमिगत गटार योजनेचा वापर करून गावातील सांडपाणी भूमिगत गटारी मार्फत विल्हेवाट लावली जाते.*अंगणवाडी :- गावात ४ अंगणवाडी कार्यरत असून अंगणवाडीत पाणी, डिजिटल शिक्षण व संगणकाचे प्राथमिक धडे दिले जातात.* माध्यमिक शाळा :- माध्यमिक विद्यालय बारशिंगवे या शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक संस्था असून त्यांचेकडून गावातील व परिसरातील विद्यार्थी व मुली यांना उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाते . तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्याकरिता सदर शैक्षणिक संस्थाकडून विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असतात.
ग्रामपंचायत बारशिंगवे ता इगतपुरी जि नाशिक
